Ticker

6/recent/ticker-posts

MDM Maharashtra School Inspection शालेय पोषण आहार योजनेची भरारी पथकाकडून शाळा तपासणी

MDM Maharashtra School Inspection शालेय पोषण आहार योजनेची भरारी पथकाकडून शाळा तपासणी 

शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणेबाबत नुकतेच एक पत्रक निर्गमित करण्यात आळे आहे. ज्यामध्ये शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करून तपासणी करण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही व महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना व शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके याची कार्यपधदती सांगितलेली आहे.

mdm-maharahstra-school-min

विषय :- शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणेबाबत. 

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्र. शापोआ-२००९/प्र.क्र.२०७/प्राशि-४, दिनांक १ जून, २००९.

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक २३/०६/२०२२ रोजी दिलेल्या सूचना.

नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून शाळांमधून विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ठ प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे, इत्यादी स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. तसेच योजनेबाबत वर्तमान पत्रामध्ये प्रतिकूल स्वरुपाच्या बातम्या छापून येत असतात. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार मिळण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरीता खालील प्रमाणे कार्यवाही करणेत यावी. 

शालेय पोषण आहार योजना सूचना- 

१. संदर्भीय शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली नियंत्रनाखाली भरारी पथक स्थापन करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

२. जिल्हा स्तरावरील भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेमधील अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती करावी. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे किंवा कसे, याबाबत तपासणी करावी.

३. भरारी पथकामार्फत जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच नागरी भागातील (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपारिषद व कटकमंडळ) पात्र शाळांची आणि केंद्रीय स्वयंपाकगृहांची तपासणी करण्यात यावी.

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भरारी पथकांमध्ये पाठविण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांची नावे निश्चित करावीत. त्यानंतर संबंधित पथकास शाळा तपासणीचा कार्यक्रम निश्चित करुन द्यावा. भरारी पथकाचा शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात यावा, जेणेकरुन अचानक शाळा तपासणी होऊन वस्तुस्थिती निदर्शनास येईल. भरारी पथक कार्यान्वित होण्यासाठी एक अधिकारी आणि किमान दोन कर्मचारी यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात यावी.

५. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा किमान १० शाळांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात यावी. भरारी पथकास शाळा तपासणी करतांना आढळून आलेल्या बाबी, भरारी पथकाच्या प्रमुखाने तीन दिवासाच्या आत अहवाल सादर करुन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या निदर्शनास आणाव्यात. सदर अहवाल प्राप्त झाल्या नंतर ज्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत. त्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात याव्यात. मात्र ही योजना राबवितांना गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

६. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी भरारी पथक गठीत करुन शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाकगृहांची तपासणी करण्यात यावी.

७. उक्त प्रमाणे जिल्हा स्तरावरील भरारी / दक्षता पथकाप्रमाणेच तालुका/युआरसी स्तरावर देखील भरारी/ दक्षता पथके स्थापन करुन योजनेची तपासणी करावी. 

८. सदर भरारी पथकाकडून संदर्भीय शासन निर्णयानुसार योजनेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी व

शाळांना भेटी देवून तपासणी करावी. तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटींचे तात्काळ निराकरण करणे, तसेच योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी.

९. शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वरील प्रमाणे भरारी पथकांमार्फत यादृच्छिक पध्दतीने तसेच गोपनिय पध्दतीने तपासण्या करण्यात याव्यात. सदर तपासणी बरोबर संबंधित यंत्रणांनी नियमित तपासण्याही करणे आवश्यक आहे.

१०. भरारी / दक्षता पथकांनी तपासणी करण्याच्या बाबी संदर्भात या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट '', '' आणि '' नूसार तपासणी नमूने देण्यात आले आहेत. या नमुन्यामध्ये आवश्यकतेनुसार अधिकची माहिती समाविष्ट करता येईल. 

११. प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या भरारी पथकांनी केलेल्या शाळाभेटी कार्यक्रमाची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी यांनी संकलीत करून एकत्रित गोषवारा परिशिष्ट '' आणि '' मधिल तक्त्यात दरमहा दहा तारखेच्या आत mdmdep@gmail.com या ई-मेलवर पाठवावी.

शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणेबाबत आलेल्या पत्रकात वरील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत सोबतच कांही पत्रक देखील देण्यात आलेले आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

शालेय पोषण आहार तपासणी पत्रक - 

शाळाभेट तपासणी पत्रक -


केंद्रीय स्वंयपाकगृह तपासणी पत्रक 

शालेय पोषण आहार तपासणी पत्रक - लिंक येथे क्लिक करा 




















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या